तब्बल पाच वर्षानंतर श्री शंकर साखर कारखान्याचा बॉयलर प्रदिपन

पश्चिम भागातील शेतकरी व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :

सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या ४९ व्या ऊस गळीत हंगामाचा बॉयलर प्रदिपन समारंभ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व त्यांच्या पत्नी नंदिनीदेवी मोहिते पाटील या उभयतांच्या हस्ते करण्यात आला.तब्बल पाच वर्षानंतर या कारखान्याचा बॉयलर प्रदिपन समारंभ मोठ्या उत्साहात संप्पन्न झाल्याने तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी,कामगार व व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले.याचवेळी कारखान्याच्या पाणी शुध्दीकरण प्रकल्पाचे उद्घाटनही करण्यात आले.
प्रारंभी सहकार महर्षी , आक्कासाहेब व स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन संचालक रामदास कर्णे व दत्तात्रय वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले.साखर कारखान्याचा ४९ व्या बॉयलर प्रदिपन समारंभाची श्री सत्यनारायण महापूजा संचालक भगवान मिसाळ व त्यांच्या सुविद्य पत्नी सुवर्णा मिसाळ यांच्या हस्ते पार पडली.
या ४९ व्या बॉयलर प्रदिपन समारंभास सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील,कांचनदेवी मोहिते पाटील,श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.रणजितसिंह मोहिते पाटील,शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख,पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील,कारखान्याचे व्हा.चेअरमन ॲड.मिलींद कुलकर्णी,संचालक सुनिल माने,सुरेश पाटील,सुरेश मोहिते,दत्तात्रय रणनवरे,सुधाकर पोळ,धोंडीराम नाळे,नंदन दाते, देवयानी सालगुडे पाटील, रमेश जगताप , संजय कोरटकर,चंद्रकांत शिंदे,दत्तात्रय चव्हाण,शिवाजी गोरे,अमित माने,कारखान्याचे कार्यकारी संचालक रविराज जगताप,कायदेशीर सल्लागार ॲड.नितीन खराडे,ॲड.दिलीप फडे यांच्यासह सभासद,कामगार उपस्थित होते.आभार संचालक सुनील माने यांनी मानले.