
एकाची प्रकृती चिंताजनक, चार चाकी गाडी पसार
नरेंद्र दिक्षीत
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडी येथे आटपाडी-दिघंची मार्गावर शहरापासून जवळच दुचाकी व चार चाकी गाड्यांच्या झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास बालटेनगर पाटी व ओढ्याच्या दरम्यान हा अपघात घडला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, आटपाडी येथील कारखाना पाटीजवळील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पाठीमागील बाजूस शासकीय गोडाऊनचे काम सुरू आहे.तेथे मिरज येथील कामगार काम करीत होते.सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ते हिरोहोंडा स्प्लेंडर गाडी (क्रमांक एम एच १० एटी ५६०१) वरून आटपाडी शहरातून गोडाऊनच्या दिशेने निघाले होते.समोरून आलेल्या चारचाकी गाडीची व त्यांच्या दुचाकीची धडक झाली. ही धडक इतकी जोरात होती की या धडकेमध्ये दुचाकीवरील सचिन चंदनशिवे नावाच्या कामगाराचा जागेवरच मृत्यू झाला.तर कासिम नावाचा व अन्य एक कामगार गंभीर जखमी झाला आहे.यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दोघांनाही आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयातून तातडीने उपचारासाठी पुढे सांगलीला रवाना करण्यात आले आहे.
या अपघातातील चारचाकी गाडी धडक देऊन निघून गेली.तिचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या कामगारांबाबतची आवश्यक माहिती घटनास्थळी उपलब्ध झाली नाही. या अपघातग्रस्त कामगारांची नाव व पत्ता अशी मूलभूत माहितीही पोलीस घेत आहेत.


संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या