जत तालुक्यातील उमराणी येथील घटना
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
उमराणी (ता.जत) येथे आईसोबत तलावात कपडे धुण्यास गेलेल्या दोघा सख्खा भाऊ-बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.सावित्री बाबुराव यादव (वय. १४)व अभिजीत बाबुराव यादव( वय १२) अशी पाण्यात बुडून अंत झालेल्या दुर्दैवी मुलांचे नावे आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, उमराणी व सिदूर रस्त्यावर यादववस्तीनजीक कुराण पाझर तलाव आहे.या पाझर तलावात मोठ्या प्रमाणात पाणी आहे.या ठिकाणी कपडे धुण्यास व जनावरांना पाणी पाजण्यासाठी लोकांची गर्दी असते. रविवारी चार वाजण्याच्या सुमारास अभिजित व सावित्री हे दोघे आपल्या आईसोबत तलावाकडे गेले होते. हे दोघेपण तलावातील पाण्यात खेळत होते. तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाय गाळात रुतल्याने दोघांनी हातात हात घालून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला.पण तो प्रयत्न अयशस्वी झाला.काळाने त्यांचा बळी घेतला.
सावित्री ही इयत्ता आठवीमध्ये शिकत होती तर अभिजीत हा इयत्ता पाचवीमध्ये शिकत होता.या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या