विक्रम फाऊंडेशनचा उपक्रम
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत शहरातील महिलांसाठी विक्रम फाऊंडेशनच्या वतीने रास दांडिया कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती विक्रम फाऊंडेशनच्या सदस्या मिनल सावंत पाटील यांनी दिली. यावेळी सौ.वर्षाताई विक्रमसिंह सावंत उपस्थित होत्या.
सौ.मिनल सावंत पाटील म्हणाल्या की, विक्रम फाऊंडेशन नेहमी महिलांसाठी निरनिराळ्या कार्यक्रमाचे आयोजन करत होते. पण कोरोनाच्या महामारीमध्ये गेली २ वर्ष महिलांसाठी कोणताही कार्यक्रम आयोजित केला नव्हता. यावेळी जत शहरातील एस आर व्ही एम हायस्कूल, जत येथे
शनिवार व रविवारी सायंकाळी ५ वाजता रास दांडिया दोन विभागात संपन्न होणार आहे. पहिला विभाग ग्रुप दांडिया व दुसरा विभाग कपल दांडिया तसेच दांडिया ह्रिदम ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. जत शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विक्रम फाऊंडेशनच्या सदस्य मिनल सावंत – पाटील यांनी केले आहे.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन