अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
तिकोंडी (ता.जत)मंडळ विभागात पांडोझरी येथे महाराजस्व अभियानांतर्गत ‘आमदार आपल्या दारी’ ही योजना राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत ‘आमदार आपल्या दारी’ या योजनेंतर्गत शासनाच्या एकूण ९ विभागाच्या मार्फत नागरिकांची विविध कामे त्याच ठिकाणी होणार आहेत.या योजनेचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार विक्रमदादा सावंत यांनी केले आहे.
या अभियानात महसूल विभाग अंतर्गत विविध प्रकारचे दाखले देण्यात येणार आहेत.जातीचा दाखला, आदिवासी दाखला, उत्पन्न दाखला, नॉन-क्रिमीलेअर, शेतकरी दाखला, ७/१२ व ८अ उतारा, फेरफार, आधार कार्ड, पॅनकार्ड, संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावण बाळ योजना, अपंग पेन्शन योजना, दूबार रेशनकार्ड, जेष्ठ नागरिक कार्ड, मतदार नोंदणी, रेशनकार्ड नाव कमी करणे / वाढविणे, अन्नसुरक्षा योजना राबविण्यात येणार आहेत.तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक उमदी यांच्या कार्यालयामार्फत ग्राम सुरक्षा दल स्थापन करणे,किट वाटप करणे,प्रशस्तीपत्र वाटप करणे हे कार्यक्रम आहेत.
सहायक अभियंता विज वितरण कंपनी संख यांच्यामार्फत विज मागणी अर्ज स्वीकारणे,विजबिलाबाबत तक्रारींचे जागेवर निपटवारा करणे,शाखा अधिकारी,बँक ऑफ इंडिया,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, संख यांच्यामार्फत जन धन योजना, शाळेतील मुला-मुलींना शून्य बॅलेन्सवर खाते उघडणे, एटीएम कार्ड देणे,विद्यार्थी खाते उघडणे या बँकेच्या योजना राबविण्यात येणार आहेत.आगार व्यवस्थापक, परिवहन विभाग यांच्यावतीने ग्रामसंपर्क योजना, मासिक पास, सवलत कार्ड ,प्रासंगिक करार मासिक वार्षिक,पिक अपशेड मागणी नोंदविणे, गावासाठी स्वतंत्र गाडीची सोय आदी मागणी करता येणार आहेत.
तालूका कृषी अधिकारी संख : एम. आर. ई.जी. एस. वैयक्तीक लाभाच्या योजना, अपघात योजना फॉर्म भरणे व माहिती देणे.
पशूवैदयकीय अधिकारी जत: पशुधन विमा धारा बि-बियाणे वाटप, कोंबडी पिल्लू / अंडी वाटप करणे. तालुका आरोग्य अधिकारी जत यांच्यावतीने कोरोनाबाबत लोकांमध्ये आणखी जनजागृती करणे, या आजाराचा प्रसार रोखणे व लसीकरणाबाबत माहिती देणे. तसेच, लसीकरण करणे, मोफत डोळे तपासणी शिबीर, रक्त तपासणी,रक्तदान शिबीर,एक दिवस बाह्यरुग्ण तपासणी शिबीर यामध्ये नाक, कान, डोळे तपासणी शिबीर ,राजीव गांधी जीवनदायी योजना, आरोग्य विमा योजना आदीबाबत माहिती व योजनेची अंमलबजावणी होणार आहे.
गटशिक्षणाधिकारी-पंचायत समिती,जत यांच्यावतीने शाळेतील विविध योजना यांची माहिती देणे, मागासवर्गीय मुलांना जातीचे दाखले देणे,मंडळ अधिकारी तिकोंडी र.न. केसेस / चौकशी अहवाल व सर्व प्रकारचे कामकाज करणे.तसेच नियोजन व बैठक व्यवस्था करण्यासाठी तिकोंडी मंडळातील सर्व तलाठी आपल्या गावातील ७/१२ व ८अ उतारा,फेरफार उतारे देणे व तलाठी यांचेशी संबंधित सर्व प्रकारचे कामे करता येतील.
याबाबत कार्यालय प्रमुख यांनी गुरुवार दि.१३ रोजी सकाळी ९.०० वाजता पांडोझरी येथे स्टॉल लावण्याच्या सूचना केलेल्या असून या योजनेचा लाभ मंडळातील सर्व गावामधील नागरीकांना मिळावा,या योजनांची कामे जागेवरच होणार असून याचा लाभ नगरिकांनी घेण्याचे आवाहन आमदार सावंत यांनी केले आहे.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन