वंचित व उपेक्षित नागरिकांनी विधी सेवा समितीचा लाभ घ्यावा : न्यायाधीश विनायकराव पाटील

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:
आटपाडी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘अखिल भारतीय जागरुकता आणि संपर्क अभियाना’चे आयोजन करण्यात आले.
यावेळी आटपाडी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश विनायकराव पाटील यांनी वंचित व उपेक्षित नागरिकांनी विधी सेवा समितीचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले.तसेच या कार्यक्रमात बोलताना आटपाडी न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधीश आनंत टेंगसे यांनी आजादी का अमृत महोत्सव व विधी सेवा समिती याबाबत मार्गदर्शन केले.
हे जागरूकता अभियान २ ऑक्टोंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत भारत देशामध्ये साजरे करण्यात येणार आहे.
आटपाडी येथील आटपाडी तालुका विधी सेवा समिती व आटपाडी तालुका वकील संघटना तसेच ग्रामपंचायत आटपाडी यांचे संयुक्त विद्यमाने आटपाडी ग्रामपंचायत येथे या जागरुकता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
आटपाडीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील,ॲड.धनंजय पाटील,ॲड.चेतन जाधव व ॲड.विलासराव देशमुख यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील,ॲड.विलासराव पाटील,ॲड.राम कुलकर्णी, ॲड.राम इनामदार,ॲड.केदार भिंगे,ॲड.निहाल पटेल,ॲड.सागर पाठक,ॲड.पुष्पांजली काळेबाग तसेच विस्ताराधिकारी बाड व कदम, ग्रामसेवक भोसले, ग्रामपंचायत सदस्यय व कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.