संजय हुलगे /माळशिरस तालुका प्रतिनिधी:


दूध उत्पादकांना सध्यस्थितीमध्ये २० रुपये इतका दर मिळत आहे. माजी दुग्ध विकासमंत्री महादेवजी जानकर यांच्या मिनिस्ट्रीमध्ये ३५ रुपये इतका प्रति लिटर दर मिळत होता. सध्या या शासनाच्या काळात मिळणाऱ्या दरातून दुधाचा उत्पादन खर्चही फिटत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे दुधाला जास्त दर मिळणे गरजेचे आहे.दूध उत्पादकांची स्थिती फार बिकट झाली आहे.दूध विकणे परवडत नसले तरी गाय पाळण्याचा,जगविण्याचा खर्च मात्र थांबत नाही.उलट चारा,सरकी पेंड,पशुखाद्य, औषधे उपचार यासह सर्वच बाबींचा दर वाढल्याने दूध उत्पादकाचा खर्च दीडपट झाला आहे. विक्रीचे दर पडले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांना रोज तोटा सहन करावा लागत आहे.या सर्व बाबींचा विचार करून गेल्या महिन्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हा व तालुका प्रशासकीय कार्यालयामध्ये निवेदनही देण्यात आले होते. परंतु राज्य शासनाने अद्याप कोणतेही ही निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी व दुग्ध व्यवसाय यांच्या हितासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने ठोस पाऊल उचलावे लागले असून 6 जुलै रोजी सकाळी 11:00 वाजता राज्यभरात आपापल्या तालुका व जिल्हा कार्यालयासमोर पांडुरंगाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून शेतकऱ्यांच्या दुधाला किमान 35 रुपये दर व 10 रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा व्हावे यासाठी माय-बाप पांडुरंगाने शासनाला सद्बुद्धी द्यावी असे साकडे घालण्यात येणार आहे.असे ॲड .संजय माने -पाटील यानी सांगितले .

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती