
रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/चांदूर बाजार(अमरावती) :
छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण मानव विकास संस्था सारथी पुणे अंतर्गत मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी तारादूत प्रकल्पाची निर्मिती झाली व राष्ट्रपती राजवटमध्ये प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर तारादूतांनी वेळोवेळी आंदोलने केली. छत्रपती संभाजीराजे यांनीसुद्धा सारथी संस्थेच्या प्रमुख मागण्यांमध्ये तारादूत प्रकल्पाची मागणी केली. १९ जून रोजी अजित पवार, छत्रपती संभाजी राजे, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक, तारादूत प्रतिनिधी व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. अजितदादांनी सारथी संस्थेच्या १३ मागण्यांपैकी सारथी तारादूत प्रकल्प चालू करण्याच्या सूचना संचालक मंडळाला दिल्या.परंतू सूचना देऊन ४ महिने उलटूनही अद्यापपर्यंत प्रकल्पाबाबत कुठलीही कारवाई झालेली नाही.त्यामुळे तारादूतांवर दोन वर्षापासून उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे आता तारादूतांना नियुक्त्या न मिळाल्यास २० ऑक्टोबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन विविध मराठा संघटना यांच्यासोबत करणार असल्याचे निवेदन मेलद्वारे दिले आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती