जतमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त दांडिया- गरबा कार्यक्रम

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत येथील श्री धानेश्वरी कॉलनी-राजाराम नगरमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त दांडिया- गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अष्टमीपर्यंत चालणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष तथा श्री धानेश्वरी मंडळाचे अध्यक्ष अमोल भैया साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. दररोज संध्याकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत दांडिया, संगीतखुर्ची व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम उत्साही वातावरणात सुरू आहेत. याप्रसंगी पं.स. सदस्या सौ. श्रीदेवी जावीर उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी मंडळाचे कार्यकर्ते महेश कुमार जगताप, बाळासाहेब साळुंखे, पांडुरंग साळुंखे, प्रा.एम्.आर.बन्नी, बाळासाहेब सूर्यवंशी (शेठ), शरण जावीर, सोलनकर, आनंदा निळे, केसगोंड, कोट्टलगी, विजय पवार (मेजर), शिवानंद तेली, संजय औताडे, हुसेन पटेल, रामचंद्र साळुंखे (मेजर), जाधव, मुचंडी, कोकणे साहेब(मेजर), संगाप्पा कनमडी मेजर, उकिर्डे, शंकर शिंदे, सुनिल पटेद, सुनिल गोसावी, पैगंबर नदाफ , मळ्ळी, शिवानंद मुडेगोळ, प्रविण तेली, महेश कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी मंडपाची व्यवस्था दत्ता पवार यांनी केली.