शहरातील औषध विक्रेत्यांचा आधारस्तंभ पडद्याआड
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :
माळशिरस शहरातील वसंत मेडिकलचे मालक तसेच सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष श्रीकांत वसंतराव पंचवाघ यांचे दुःखद निधन झाले.
माळशिरस शहरातील पहिलं मेडिकल यांचे ते मालक, माळशिरस शहरातील औषधविक्रेत्यांचा आधार होते. तो आधारच हरपला आहे. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ,मनमिळावू,योग्य मार्गदर्शन करणारा होता. हनुमान शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष,तसेच हनुमान मोफत वाचनालयाचे अध्यक्ष होते.त्यांच्या निधनाने माळशिरसमधील सर्व औषध विक्रेत्यांवर,माळशिरस शहरातील सर्व जनतेवर तसेच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,मुली,जावई,भाऊ,भावजयी, पुतणे, पुतणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने माळशिरस शहरातील जनतेतून हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती