‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी होऊन बंद यशस्वी करा-आ.विक्रमसिंह सावंत

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

तीन कृषी कायद्याच्या विरोधात उत्तर भारतातील शेतकरी अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. शांततेच्या मार्गाने चालू असलेल्या आंदोलनाला उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने गाडी घालून चिरडले. यामध्ये आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.त्या विरोधात देशभर संतापाचे वातावरण पसरले आहे.या घटनेचा निषेध म्हणून ११ आँक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व इतर घटक पक्षाच्या वतीने महाराष्ट्र बंद पाळण्यात येणार आहे.व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन बंदला सहकार्य करण्याचे आवाहन काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष व आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, शिवसेना जत तालुका संघटक बंटी दुधाळ, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष रफिक शेख, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, नगरसेवक भुपेंद्र कांबळे, सलीम पाच्छापूरे आदी उपस्थित होते.