
नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माडगुळे:
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माडगुळे शाखेचा ३० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
ग.दि.माडगूळकर हायस्कूल व पद्मभूषण वसंतदादा पाटील ज्युनियर कॉलेजच्या स्कूल कमिटीचे चेअरमन एन.बी.विभुते प्रमुख पाहुणे व माजी सरपंच संजय विभुते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.शाखा व्यवस्थापक विश्वजीत देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.बँकेची सध्याची आर्थिक स्थिती,वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली.या शाखेचा तालुक्यात आर्थिक उलाढालीत दुसरा क्रमांक लागतो असे सांगितले.
महिलांना आपला संसाराचा गाडा सांभाळत असताना आर्थिक संकटे येतात.त्यांना पाठ देऊन थोडी थोडी रक्कम बचत करण्याची सवय या बँकेच्या माध्यमातून लागली आहे.समाजात वावरत असताना आपली आर्थिक बाजू भक्कम असावी असे प्रत्येक महिलेला वाटत असते,त्यासाठी बचत गटाच्या माध्यमातूनही त्या आर्थिक बचतीची सवय करून घेत आहेत.गावात सध्या बचत गटाच्या माध्यमातून बरेच व्यवसाय सुरु करण्याच्या धडपडीत महिला वर्ग आहे. त्यांना ही बँक कर्जरूपाने भांडवल देत आहे. त्याचा लाभ गावातील महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास मोहनराव विभुते,भाऊ कुलकर्णी,गुलाबराव माडगूळकर,ज्येष्ठ नागरिक प्रभाकर झोडगे, हर्षल विभुते, बापूसाहेब विभुते,महादेव मंडले, प्रवीण झोडगे, जालिंदर दयाळ, रेश्मा गुरव, अर्चना माडगूळकर, बायडाबाई वाघमारे, मनीषा विभुते,रंजना विभुते,गावातील बचत गटातील महिला व इतर महिला उपस्थित होत्या.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती