प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:
जलजीवन योजने अंतर्गत आटपाडी तालुक्यातील 19 गावांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून 1436.28 लक्ष ( 14 कोटी, 36 लाख, 28 हजार)रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती भाजपा नेते जयवंतराव सरगर यांनी दिले.
आमदार गोपीचंद पडळकर व माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख व सभापती सौ.पुष्पाताई जयवंतराव सरगर यांचे या कामासाठी शेवटपर्यंत चांगले सहकार्य लाभले.
आटपाडी पंचायत समितीच्या सभापती सौ. पुष्पाताई जयवंतराव सरगर व सर्व सदस्य, तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, गट विकास अधिकारी तसेच पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी व स्टाप या सर्वांच्या अथक प्रयत्नाने आटपाडी तालुक्यातील पूर्वीची 10 व आत्ताची 9 अशा 19 गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.
1) मासाळवाडी – 15.29
2) गुळेवाडी – 19 .04
3) आंबेवाडी – 44 .28
4) राजेवाडी – 112. 65
5) भिंगेवाडी – 36 .2 6
6) खानजोडवाडी – 38.18
7) गळवेवाडी- 92.13
8) पुजारवाडी(आ) – 139. 86
9) मुढेवाडी – 39 .10
10) माडगुळे- 28. 38
11) वाक्षेवाडी- 27 . 87
12) पारेकरवाडी – 61. 21
13) मानेवाडी- 41. 86
14) कानकात्रे वाडी- 34.82
15) घाणंद- 64 .60
16) माळेवाडी -21.61
17) लेंगरेवाडी – 33 . 49
18) बनपुरी- 199.61
19)दिघंची- 386 .04
या 19 गावांना पहिल्यांदाच प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे.
उर्वरित आटपाडी तालुक्यातील सर्व गावांचा पुढील चार-पाच महिन्यात प्रश्न सुटणार आहे. त्याही गावांचा सर्वे चालू झाला आहे. बाकीच्या गावचा यापूर्वीच राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. सर्व कामे अंतिम टप्प्यात आलेली आहेत. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील सर्व गावांचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे.
सांगली जिल्ह्यात जलजीवन योजनेतून एकूण 58 गावांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली असून त्यापैकी आटपाडी तालुक्यातील 19 गावांचा समावेश आहे .त्यामुळे जनजीवन योजनेत आटपाडी तालुक्याने आघाडी घेतलेली आहे.
आटपाडी पंचायत समितीच्या सभापती सौ. पुष्पाताई जयवंतराव सरगर यांनी सभापती पदाचा पदभार घेतल्यापासून व जलव्यवस्थापन समितीमध्ये सदस्य म्हणून निवड झाल्यापासून त्यांनी आटपाडी तालुक्यात जोरदार कामाची सुरुवात केली आहे. आटपाडी तालुक्याला सर्व योजनेतून जेवढा जास्तीत जास्त निधी मिळवता येईल, तेवढा जास्त निधी सभापती आपल्या माध्यमातून व आपल्या नेते मंडळी,च्या माध्यमातून खेचून आणत आहेत.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती