माळशिरस येथे माजी मंत्री जानकर यांची शुभम हॉस्पिटलला सदिच्छा भेट

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

माळशिरस येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी दुग्धविकास,पशुसंवर्धन व मत्स्य मंत्री महादेव जानकर यांनी शुभम हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली.यावेळी डॉ.दत्तात्रय सर्जे, डॉ.दिपाली सर्जे व लोकराज उद्योग समूहाचे अध्यक्ष पांडुरंग वाघमोडे यांनी माजी मंत्री महादेव जानकर यांचा यथोचित सन्मान केला.
यावेळी माऊली सलगर,अॅड.अजित पाटील, नितीन धायगुडे, अॅड.संजय माने पाटील, शाहिद मुलाणी, पै. रणजित सुळ, माऊली सरक, तालुका अध्यक्ष वैजनाथ पालवे,नामदेव टकले, सागर राऊत,अमर जानकर , तानाजी खरात,महादेव भोसले व राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.