
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
निंबवडे येथील कारंडेवस्ती येथे अहिल्यादेवी होळकर जलसिंचन योजनेतील विहिरीचे भूमिपूजन आमदार गोपीचंद पडळकर यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपा नेते जयवंतराव सरगर,उपसभापती दादासाहेब मरगळे,सरपंच देटे, उपसरपंच धोंडीराम मेटकरी,माजी उपसरपंच नाथासो बुधावले, ग्रा.पं. सदस्य कुंडलिक पिंजारी,ग्रा.पं.सदस्य रावसाहेब पाटील,ग्रा.पं.सदस्य गणेश कबीर,ग्रा.पं.सदस्य अमर मुढे,ग्रा.पं.सदस्य आबासो अनुसे,पंचायत समितीचे अधिकारी महेश गावंदरे,ग्रामसेवक करने, ज्येष्ठ नेते शिवाजीतात्या मुढे, युवा नेते अर्जुन मुढे या सर्वांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. यावेळी निंबवडे कारंडेवस्ती येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी तालुक्यातील सर्व लोकांनी रोजगार हमी योजनेतून मिळणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले.आमदार गोपीचंद पडळकर सध्या महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेच्या कमिटीवर सदस्य म्हणून आहेत.रोजगार हमी योजनेच्या अनेक योजना आहेत,त्या सर्व योजनांचा ग्रामीण भागातील लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती