जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचा मासोद येथे प्रकल्प दौरा

रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/चांदूर बाजार(अमरावती):

अमरावती जिल्हाच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी प्रकल्प दौरा केला. चांदूर बाजार कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत चांदुर बाजार तालुक्यातील मासोद येथे युवा शेतकरी राहुल भाऊ किटूकले यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन पॉली हाऊस फुल शेतीची पाहणी केली व माहिती जाणून घेतली.
प्रकल्प करताना येणाऱ्या समस्या ऐकून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.त्यामध्ये त्यांना गौरव कीटूकले सदस्य ग्रामपंचायत व नानाजी देशमुख कृषी प्रकल्प समिती यांनी शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडल्या. प्रकल्प सुरू करताना कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकेच्या नियमांचा होणारा त्रास,संत्रा पिकाची होणारी मोठ्या प्रमाणावर फळगळती, सन २०२०-२१ या वर्षातील संत्रा पिकाच्या गारपीट पीक विम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना पोहचली नाही. शासनाने ई-पीक पाहणी एपद्वारे पीक पेरा भरण्यासाठी येणाऱ्या समस्यासह इतर समस्यासाठी निवेदन दिले. त्यांनतर जिल्हाधिकारी यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष संत्रा पिकाच्या होणारी फळगळतीची पाहणी केली. त्यांनी समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आणि समस्याचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.त्याबद्दल गौरव कीटूकले यांनी ग्रामपंचायत व समस्त शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी व तहसीलदार धिरज स्थूल यांचे प्रकल्पसाठी वेळोवेळी मदत करणारे कृषी विभागाचे SDO सातपुते, कृषी सहायक काजळकर,सांगळे,औतकर,समूह साहाय्यक शीतल खोंड,खारोडे,कृषी विभाग चांदुर बाजारचे सर्व कर्मचारी तहसीलदार,मंडळ अधिकारी भुजाडे , पटवारी काझी यांचे ग्रामपंचायत मासोद तसेच समस्त शेतकऱ्यांचा वतीने आभार मानले.