

माळशिरस तालुक्यातील बचत गटांना २ कोटी,३२ लाखांचे कर्ज वाटप !
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
महिला आर्थिक विकास महामंडळ,जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष,पंचायत समिती माळशिरस अंतर्गत सादर करण्यात आलेल्या तालुक्यातील १०८ बचत गटांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप स्वामी यांच्या हस्ते २ कोटी, ३२ लाख, ७७ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी नितीन शेळके,जिल्हा बॅंक व्यवस्थापक प्रशांत नाशिककर,जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे,उमेदच्या जिल्हा व्यवस्थापक मिनाक्षी मडवळी,सभापती शोभा साठे,माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील,जिल्हा परिषद सदस्य सुनंदा फुले,मंगल वाघमोडे,पंचायत समिती सदस्या हेमलता चांडोले,गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, सतीश भारती,राजकुमार पवार यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
प्रारंभी तालुका व्यवस्थापक रणजित शेंडे यांनी प्रास्ताविक करुन बचत गटांची माहिती दिली. सूत्रसंचालन तनुजा पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन गायकवाड,उमेश जाधव यांनी सहकार्य केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापुर, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष सोलापुर, पंचायत समिती माळशिरस अंतर्गत तालुका अभियान कक्ष माळशिरस अंतर्गत अंगणवाडी अभियान कृतीसंगम घटकाअंतर्गत माळशिरस बालविकास प्रकल्प अंतर्गत पोषण अभियान दशसुञी कार्यक्रम पार पडला.
नवतेजस्विनी विक्री केंद्र माळशिरस बचत गट निर्मिती वस्तूंचे विक्री दालन-मार्केटिंग आउट्लेट येथे भेट दिली व बचत गट उत्पादित वस्तुंची पाहणी केली.
यावेळी राष्ट्रीय ग्रामिण आर्थिक परिवर्तन प्रकल्प अंतर्गत उद्योजकता विकास केंद्र कार्यालय माळशिरस येथे उद्घाटन करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एम एस आर एल एम अंतर्गत ‘एक ग्रामपंचायत, एक सखी’ प्रकल्प अंतर्गत माळशिरस तालुक्यातील बीसी सखी यांना आर्थिक व्यवहारासाठी डायजीपे मशीनचे वितरण करण्यात आले.
सामाजिक उद्योजकता विकास उपक्रम अंतर्गत बागेचीवाडी, खुडुस याठिकाणी तेजस्विनी रोपवाटीका नर्सरीचे उदघाटन करण्यात आले.जिल्हा अभियान कक्ष सोलापुरमार्फत राष्ट्रीय आर्थिक परिवर्तन प्रकल्प अंतर्गत सावित्रीबाई फुले यशवंतनगर याठिकाणी कृतीसंगम प्रकल्प अंतर्गत मॉडेल पोषण परसबाग उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती