
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व बांधकाम कामगार संघटनाच्या वतीने अभियंता महोत्सव वर्ष सातवे व कै. महादेव अण्णा अवताडे मंगळवेढा यांच्या स्मरणार्थ मोक्षगुंडम सर विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त जतमध्ये विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती महाराष्ट्र शासन अल्पसंख्यांक कल्याण समितीचे सांगली जिल्हा सदस्य सलीम गवंडी यांनी ही माहिती दिली आहे. शनिवार २५ सप्टेंबर रोजी मोक्षगुंडम सर यांच्या जयंतीनिमित्त सकाळी ११ वाजता बचत भवन येथे जयंती साजरी करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन आमदार समाधान आवताडे (मंगळवेढा) यांच्या हस्ते होणार आहे.पंचायत समितीचे सभापती मनोज जगताप कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत.सत्कारमूर्ती म्हणून कुमार पाटील,पृथ्वीराज चव्हाण, रमेश पाटील, डॉ. रवींद्र आरळी, महावीर पाटील, अभिमन्यू मासाळ,मेडीदार, प्रवीण पाटील इरिगेशनचे सर्व उप अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता व जिल्ह्यातील व जत तालुक्यातील अभियंता यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.या कार्यक्रमासाठी माजी सभापती सुरेशराव शिंदे,माजी सभापती प्रकाश जमदाडे,अतुल कांबळे,संजय सावंत,प्रभाकरभाऊ जाधव,बाबासाहेब कोडग,श्रीकांत शिंदे,अंकुश हुवाळे, रज्जाकभाई नगारजी,अमित (बंटी ) दुधाळ आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तसेच २५ सप्टेंबर रोजी सलिम गवंडी यांचा वाढदिवस सोहळा याच ठिकाणी संपन्न होणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पालन करत हे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती