घरकुलांसाठी उपसरपंचाचे बीडीओंना निवेदन

रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /चांदूर बाजार (अमरावती):

खरवाडी येथील वंचित घरकुल लाभार्थ्यांना त्वरित घरकुल देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन उपसरपंच सागर शिंगाडे यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहे.
चांदूरबाजार तालुक्यातील खरवाडी येथील पात्र लाभार्थी यांची यादी २०१६ ला ग्रामसभेमध्ये करण्यात आली असून त्यामध्ये (ड)ची प्रतीक्षा यादी करण्यात आली होती.परंतु यामध्ये महत्वाचे ओबीसी कुटुंबातील लाभार्थ्यांना अद्याप घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. त्या सर्व पात्र घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा.तसेच एस.सी., एस.टी. व एन.टी. या प्रवर्गातील सर्व जे कुटुंब प्रतीक्षा यादीत नाव आहे असे लाभार्थी व ज्या लाभार्थ्यांनी घरकुलाचा प्रस्ताव सादर केला अशा सर्व लाभार्थ्यांना मोका पाहणी करून लाभ देण्यात यावा.तसेच यावर कोणतीच कार्यवाही न झाल्यास आंदोलन करू असे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती चांदूरबाजार यांना उपसरपंच सागर शिंगाडे यांनी दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजयराव तंतरपाळे,तंटामुक्ती समितीचे अधक्ष राजेश अढाऊ,अजिंक्य बंड उपस्थित होते.