बनाळीत लोकअदालतीला प्रतिसाद!

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

बनाळी (ता.जत) येथे लोकअदालत पार पडली.चांगला प्रतिसाद मिळाला.या लोकअदालतीमध्ये ७५ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.त्यापैकी एक दिवाणी प्रकरण तडजोडीने निकाली काढण्यात आले.उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या लोकअदालतीचे आयोजन तालुका विधी सेवा समिती व पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले.
अदालतीमध्ये एस.बी.सौदागर,आर.के.मुंडेचा यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले.पॅनलप्रमुख म्हणून एस.ए.उपाध्ये यांनी काम पाहिले.प्रभारी गट विकास अधिकारी दिनकर खरात,पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत,ग्रामसेवक आप्पासो माळी,सरपंच विद्या सावंत आदी उपस्थित होते.