आटपाडीत ‘श्री भवानी एज्युकेशन’ मध्ये दगडूकाका दौंडे यांना श्रद्धांजली!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी :
श्री भवानी एज्युकेशन सोसायटीचे संचालक दगडूकाका पांडुरंग दौंडे यांचे पंढरपूर येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
दगडूकाका हे आटपाडीतील सुप्रसिद्ध व प्रतिष्ठित व्यापारी दौंडेअप्पांचे चिरंजीव होते. त्यांनी भवानी एज्युकेशन सोसायटीचे संचालक म्हणून केलेली सेवा संस्थेच्या इतिहासात नोंद होईल.दगडूकाका यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारातील त्यांची पत्नी,मुली, जावई, नातवंडे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या परिवाराला हे दुःख सहन करण्याची परमेश्वराने शक्ती द्यावी, अशी भावपूर्ण श्रद्धांजली राजाराम बापू हायस्कूलवर झालेल्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन रावसाहेब (काका) पाटील यांनी वाहिली. दादासाहेब मोटे, तसेच मुख्याध्यापक टी.डी.चव्हाण यांचे श्रद्धांजलीपर भाषण झाले.सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी,संस्थाचालकांनी श्रद्धांजली वाहिली.