
रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ चांदूर बाजार(अमरावती):
चांदुर बाजार भूमी अभिलेख कार्यालय येथील भूकरमाफक पदावर असणाऱ्या दिशा उईके गेल्या दीड वर्षांपासून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायबाबत सहा महिन्यापासून लढा देत होत्या. त्यावर कुठेही कार्यवाही होताना दिसत नव्हती. वरिष्ठ अधिकारी चौकशीच्या नावाने तारीख देत आहेत व मानसिक त्रास देत असून माझ्यावर उघड असलेल्या अन्यायावर कोणीही याबाबत कार्यवाही करीत नाही,असे लक्षात येताच दिशा उईके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करून शासनाविरुद्ध उलगुलांन पुकारला. यांची दक्षता घेत ४ दिवसांपासून सुरू असलेले दिशा उईकेंचे आमरण उपोषण कळताच आमदार रविभाऊ राणा यांनी उपोषण स्थळाला भेट दिली. महिला कर्मचारी यांच्या मागण्या या रास्त असून त्यांच्यावर आतापर्यंत झालेला अन्याय आहे,तेव्हा आमदार रवी राणा यांनी तातडीने मध्यस्थी करून ४ मागण्या मान्य करून दोन मागण्या प्रस्तावित करून याचा पाठपुरावा आमदार करतील असे ग्वाही देत उपोषण मागे घेण्यात आले. सर्वसामान्यासाठी नेहमी झटत असणारे रविभाऊ आज प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी शासन दरबारी दिशा उईके यांचा प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याची भूमिका निभावली जाईल व वरील सर्व मागणीसाठी मी स्वतः पाठपुरावा करून पूर्ण करून देईल, कुठेही आदिवासी महिला कर्मचारी यांना त्रास होत असेल तर मी नेहमी पाठीशी खंबीरपणे उभा आहे,असे स्पष्ट मत मांडून उपोषण मागे घेण्यात आले.
बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन युवनाते, जिल्हा परिषद सदस्य दिनेश टेकाम,जि.प.सदस्य नरेश भाऊ गेडाम,आनंद इंगळे,रामेश्वर युवनाते,माजी महापौर वंदनाताई कंगाले, वाडीवे,आशिष राऊत, परमेश्वर वरठे, प्रशांत मडावी, पियुष पंधरे, बंडू मर्सकोल्हे, वैभव लोखंडे असे विविध संघटनचे पदाधिकारी उपस्थित होते.
पाठिंबा देणारे संघटना आदिवासी युवा क्रांती दल , ट्रायबल फोर्स, बिरसा क्रांति दल, आदिवासी भिल समाज संघटना अकोट ,रिपाई आठवले गट ,स्वतंत्र मजदूर युनियन, बसवनाथे व यु.बी.शहारे अशा संघटनांनी पाठिंबा देत दिशा उईके यांना न्याय देण्यास सहकार्य केले.
“दीड वर्षांपासून आपल्यावर होत असलेल्या अन्यायबाबत भूमी अभिलेख कार्यालय चांदुर बाजार येथील कु. दिशा उईके आपल्या वरीष्ठ अधिकारी यांना पत्रव्यवहार करीत होत्या. असे एक दोन नव्हे तर शेकडो पत्रे त्यांनी जिल्हाधिकारीपासून तर मुख्यमंत्री ,आमदार, खाजदार, अशा सर्वांना निवेदन देऊन आपली व्यथा मांडली. परंतु न्याय मिलाळा नाहीच.त्यावेळी बिरसा क्रांती दलाच्या माध्यमातून आवाज उठवून ही संपूर्ण कैपियत मांडून होत असलेला अन्याय दाखवण्याचे काम संघटनेने केले. दिशा उईकेला आमदार रविभाऊ राणा यांच्या मध्यस्थीने न्याय मिळवून देण्यास मदत झाली. परंतु जिल्हात आदिवासी आमदार असतानासुद्धा आदिवासी महिलेवर होत असलेल्या अन्यायाबाबत दखल न घेणे नवलच वाटते. यावर समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.”
अर्जुन युवनाते
बिकेडी जिल्हाध्यक्ष

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती