
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:
जत तालुक्यातील उमदी येथील टायगर ग्रुपच्यावतीने उमदी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.त्याचबरोबर उमदी पोलीस स्टेशन,ग्रामपंचायत कार्यालय व कणकेरी मठ येथे वृक्षारोपण करण्यासाठी वृक्ष भेट देण्यात आली.
चालू पावसाळ्यात टायगर ग्रुपने अडीच ते तीन हजार वृक्षारोपण करण्याचे काम हाती घेतले आहे. काही वृक्ष फळफळावटीची,औषधी गुणकारी,जंगली व सावली देणारी अशा झाडांचा समावेश आहे.उमदी गावात व उमदी खालील विठ्ठलवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष सुनिल सातपुते,सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल बिराजदार,मानतेश तेली,रविंद्र व्होनमुखे, विनायक हुन्नर,बबलू वाघमोडे,आदित्य जाधव,पै. गुंडाराज बजंत्री,अमृत सातपुते,गणपत सातपुते, दत्तात्रय व्होनमुखे उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद