येळीवमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ!

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:

येळीवमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ विधान परिषेदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील,माळशिरसचे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून येळीव ते मेडद रस्त्यासाठी २कोटी, ७५ लाख रुपये मंजूर झालेल्या व मौजे येळीव वाडी नंबर २ येथे दलितवस्ती सुधार योजनेतून मंजूर झालेल्या कामाचा शुभारंभ,मोहिते वस्ती,जाधव वस्ती येथील पाठपुरवठा योजनेचा शुभारंभ, धाइंजेवस्ती रस्ता ,धाइंजेवस्ती पेव्हिंग ब्लॉक इत्यादी एकूण १४ लाख, ७० हजार रुपये कामांचे भूमिपूजन विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते – पाटील, सभापती शोभा साठे ,उपसभापती प्रतापराव पाटील, मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, सोलापुर जि.प सदस्य संगिता मोटे,राहुल वाघमोडे,माजी सरपंच अर्जुन धाईजे ,संचालक सचीन रणनवरे,मेडद उपसरपंच शिवाजी लवटे ,विलास निबांळकर ,पोपट निबांळकर ,ज्ञानदेव निबांळकर , माऊली निबांळकर , अतुल सांवत, उपसरपंच अरुणा निबांळकर , सौ. सुवर्णी वाघमोडे , वैभव पाटील,अंगत शिर्के, विक्रम फडतरे, भैया फडतरे, संतोष कुदळे, प्रशांत धाईजे ,राहुल देशमुख व इतर मान्यवर व येळीव ग्रामस्थ उपस्थित होते.