सभापती सौ.पुष्पाताई सरगर यांच्या निधीतून निंबवडे गणातील गावांना ९ लाखांचा निधी मंजूर

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:
आटपाडी पंचायत समितीच्या सभापती सौ.पुष्पाताई जयवंत (भाऊ) सरगर यांचे स्थानिक निधीतून आमदार गोपिचंद पडळकर व माजी आमदार राजेंद्र (आण्णा) देशमुख यांचे सहकार्याने निंबवडे पंचायत समिती गणातील गावांना नऊ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे,अशी माहिती भाजपा नेते जयवंतराव सरगर यांनी दिली.
१)वाक्षेवाडी (कोकरेखोरा) जिल्हा परिषद शाळा येथे – सिमेंट काँक्रीट पाण्याची टाकी -१०००००/-
२) मुढेवाडी एस टी स्टॅन्ड येथे एक – हायमास्ट – ११२०००/-
३) अनुसेवाडी निंबवडे जिल्हा परिषद शाळा येथे – सिमेंट काँक्रिट पाण्याची टाकी – १२५०००/-
४) यशवंतनगर निंबवडे येथे एक – हायमास्ट – ११२०००/-
५) निंबवडे जोतिबा मंदिराच्या समोरील खुल्या जागेत एक – हायमास्ट – ११२०००/-
६) गळवेवाडी (शिवाजीनगर) जिल्हा परिषद शाळा येथे – सिमेंट कॉंक्रीट पाण्याची टाकी – १०००००/-
७) लिंगीवरे जिल्हा परिषद शाळा येथे – सिमेंट काँक्रीट पाण्याची टाकी – १२५०००/-
८) राजेवाडी राजमाता चौक येथे एक – हाय मास्ट – ११२०००/-
या कामांना निधी उपलब्ध केला आहे.तसेच निंबवडे पंचायत समिती गणातील उर्वरित गावांना दोन महिन्यात निधी देण्यात येईल असे सभापती सौ.पुष्पाताई जयवंत(भाऊ) सरगर यांनी सांगितले.