आटपाडी तालुक्याला एक कोटी,४० लाख ₹ विकासनिधी मंजूर : सभापती सौ.पुष्पाताई जयवंतराव सरगर

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:
आटपाडी तालुक्यातील गावांना एक कोटी,४० लाख रुपये विकास निधी मंजूर झाल्याची माहिती पंचायत समितीच्या सभापती सौ.पुष्पाताई जयवंतराव सरगर यांनी दिली.
आटपाडी पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना १५ व्या वित्त आयोग निधीतून आटपाडी तालुक्यातील गावांसाठी हा निधी मंजूर झाला आहे.एकूण एक कोटी,४० लाख रुपये विकास निधी मंजूर झाला आहे.त्यापैकी ७० लाख रुपये निधीची कामे मंजूर झाल्याची माहिती सभापती सौ.सरगर यांनी दिली.