भिंती कोसळल्या…घरात पाणी…काही घरे जमीनदोस्त!

पावसामुळे कारला येथे हाहाकार!
रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/चांदूर बाजार(अमरावती):

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील कारला येथे रात्री झालेल्या पावसामुळे नागरिकांच्या घरात अचानक पाणी शिरले. घरातील अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. येथील नागरिक हतबल झाले आहेत.तर काही नागरिकांच्या घराच्या भिंती कोसळल्या.तसेच गावातील काही घरे पडून जमीनदोस्त झाली. गावातील युवा समाजसेवक देवेंद्र भोडे यांनी तलाठी देशमुख यांच्याशी संपर्क साधल्याने तलाठी ताबडतोब येऊन गावातील नुकसान पाहणी केली. झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे व गावातील घरांचे नुकसान झाल्याने येथील नागरिक संकटात सापडले आहेत. शासनाने लवकर पंचनामे करून नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी नुकसानग्रस्त नागरिकांची मागणी आहे.