शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न

रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/चांदूर बाजार(अमरावती):

गणेशउत्सवाच्या पाश्र्वभूमीवर स्थानिक सिरजगाव कसबा पोलिस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. यावेळी ठाणेदार दिपक वळवी यांनी सर्व नियम व अटींचे मार्गदर्शन केले. तसेच अचलपूर विभागीय पोलिस उपअधीक्षक पी.जे.अबदागिरी यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूपातून खाजगी स्वरूपात साजरा कसे करता येईल? कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी लोकांनी गर्दी टाळण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन पोलिस उपअधीक्षक अबदागिरी यांनी केले.