आटपाडी तालुक्यातील सरपंच ग्रामसेवकांचे प्रशिक्षण संपन्न

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी :
आटपाडी येथे सरपंच व ग्रामसेवकांचे प्रशिक्षण पार पडले.
सभापती सौ.पुष्पाताई जयवंतराव सरगर व उपसभापती दादासाहेब मरगळे, भाजपा नेते जयवंतराव सरगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सांगली जिल्हा परिषद व आटपाडी पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सरपंच,ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे हे प्रशिक्षण आज घेण्यात आले. या प्रशिक्षणाकरिता आटपाडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मनोज भोसले, सहाय्यक गटविकास अधिकारी भोसले,आटपाडी व विटा येथील विस्तार अधिकारी उपस्थित होते.