
पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला आहे,त्या सर्वांना रेबिज लस देण्यात यावी:अजिंक्यतारा विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकरभाऊ जाधव यांची मागणी
पाठलाग करून कुत्र्याला मारल्याने गावक-यांनी सोडला सुटकेचा निश्वास!
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
कुंभारी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने पंधराजणांना चावा घेतला.ग्रामस्थांनी पाठलाग करून कुत्र्याला मारल्याने गावक-यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
जत तालुक्यातील कुंभारी येथे दोन दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला होता.हे कुत्रे संपूर्ण कुंभारी परिसरात फिरत होते व अचानकच एखाद्याच्या अंगावर जाऊन त्याला चावत होते.यामुळे कुंभारी परिसरातील लोक भयभीत झाले होती. काहीजण तर या कुत्र्याला शोधण्यासाठी त्याच्या मागावर होते. परंतु हे कुत्रे सर्वांना चकवा देऊन पसार होत होते.
दोन दिवसात या पिसाळलेल्या कुत्र्याने कुंभारीतील जवळपास पंधरा लोकांचा चावा घेतला आहे.यातील अनेकजण सांगली व मिरज येथील दवाखान्यात उपचार घेत आहेत.
या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे कुंभारी गावात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.शनिवारीही या कुत्र्याने अनेकजणांचा चावा घेतला होता.त्यामुळे कुंभारी ग्रामस्थांनी या कुत्र्याचा पाठलाग करून त्याला ठार मारले.पिसाळलेले कुत्रे मारले गेल्याने कुंभारी येथील ग्रामस्थानी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
कुंभारी येथे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने आरोग्य विभागाने व ग्रामपंचायतीने सर्वे करून या कुत्र्याने ज्या लोकांना चावा घेतला आहे व ज्या पाळीव जनावरांच्या अंगावर या पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला आहे,त्या सर्वांना रेबिज प्रतिबंधक उपाययोजना म्हणून रेबीज लस देण्यात यावी अशी मागणी अजिंक्यतारा विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकरभाऊ जाधव यांंनी केली आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती