
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /सांगली:
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या माध्यमातून शिक्षकांचे आर्थिक व सामाजिक मूल्य वाढविण्यात शिक्षक बँकेचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ताताई कोरे यांनी केले. शिक्षक बँकेस सदिच्छा भेट देऊन नुकताच म्हैसूर येथे मिळालेल्या मानाच्या बँको पुरस्काराच्या सन्मानार्थ चेअरमन यु.टी.जाधव व व्हाईस चेअरमन राजाराम सावंत यांचा सन्मान केला.
त्यांनी शिक्षक बँकेच्या विविध योजनांचा आढावा घेत समाधान व्यक्त केले व सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन करून उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी शिक्षक बँकेचा दुर्दैवाने एखादा सभासद मयत झाल्यानंतर मृतसंजीवनी योजनेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मदत कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत व्हाईस चेअरमन राजाराम सावंत यांनी केले. यावेळी बँकेचे चेअरमन यु.टी.जाधव यांनी शिक्षक बँकेच्या माध्यमातून सभासद हिताच्या राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
यासाठी शिक्षक समितीच्या पुरोगामी सेवा मंडळाच्या मार्गदर्शनाखाली राज्यनेते विश्वनाथ मिरजकर,माजी राज्य कोषाध्यक्ष किरणराव गायकवाड,राज्यसंघटक सयाजीराव पाटील,पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष किसनराव पाटील,सचिव शशिकांत भागवत,शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड,सरचिटणीस दयानंद मोरे व सर्व संचालकांच्या सहकार्याने आम्ही बँकेची गतिमान प्रगतीची पावले टाकत आहोत असे सांगितले.
यावेळी शिक्षक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी.कोले,व्यवस्थापक महांतेश इटंगी,असिस्टंट मॅनेजर प्रमोद पाटील व विजय नवले,विभुतवाडीचे सरपंच चंदकांत पावणे, थोरात,कैलास वाघमारे,आदि उपस्थित होते.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन