आटपाडी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचे ‘पिटा’मधून नाव बाहेर
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
आटपाडी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचे नाव ‘पिटा’मधून बाहेर काढण्यात आल्याची माहिती देवकर यांचे वकील ॲड.धनंजय पाटील यांनी दिली.
ॲड.धनंजय पाटील म्हणाले,’जानेवारी २०२१ मध्ये सांगली पोलिसांनी आटपाडीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अरुण देवकर व त्यांचे मित्र तसेच हाॅटेल मालक वगैरे ६ जणांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध PITA कायद्याच्या कलम 3, 4 व 5 तसेच भारतीय दंड संहिता कलम 370 A (2), 370(2), 370(3) अंतर्गत सांगली ग्रामिण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नंबर 34/2021 दाखल केला होता.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर टी.व्ही.,वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या होत्या.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पोलीसांची नाचक्की झाली होती.
गुन्हा दाखल झाल्याने देवकर यांना पोलिसांनी न्यायालयात लगेच हजर केले होते.सदरची बनावट व खोटी केस केली आहे, त्यामुळे ही केस माझेविरुद्ध लागूच होत नाही, असे देवकर यांचे म्हणणे होते.दोन्ही बाजूंचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेऊन त्यांना पहिल्याच दिवशी जामीन मंजूर केला होता.
माझे विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करु नये, असे देवकर यांचे म्हणणे पोलिसांना होते, परंतु सांगली ग्रामिण पोलीस स्टेशनच्या अधिकारी यांनी देवकर यांचेविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर सुरवातीलाच प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टासमोर माझ्या विरोधात खोटी केस केली आहे. त्यामुळे माझ्या विरोधात केस चालू करु नये ‘इश्यू प्रोसेस’ करु नये असे देवकर यांचे म्हणणे होते. परंतु प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारीसो यांनी इश्यु प्रोसेस ऑर्डर केली होती. त्यामुळे नाराज होऊन देवकर यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील-रिवीजन नंबर 34/2021 केले होते.त्यामुळे न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून देवकर यांच्याविरुद्ध केस चालू शकत नाही, असा निकाल देऊन केसमधून नाव कमी करण्याचे आदेश केले व इतर पाच आरोपींविरुद्ध केस चालूच राहणार’ असल्याचे ॲड.पाटील म्हणाले.
‘सत्यमेव जयते’ या ब्रीद वाक्याप्रमाणे मला न्याय मिळाला अशी भावना देवकर यांनी व्यक्त केली. परंतु अशा लाजिरवाण्या आणि क्लेशकारक परिस्थितीमध्ये मला खूप शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक ताण सहन करावा लागला. या दरम्यान अशा वेदनादायक परिस्थितीत खंबीरपणे माझ्या पाठीशी जे जे लोक उभे राहिले त्यांचे मनापासून आभार मानतो, अशी भावना देवकर यांनी व्यक्त केली.
तत्कालीन पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्यावतीने ॲड. तेजस पुणेकर व ॲड. धनंजय पाटील आटपाडी यांनी काम पाहिले.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन