आटपाडी पंचायत समितीच्या आढावा बैठकीत कामे पूर्ण करण्याच्या सूचना

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडी पंचायत समितीची आढावा बैठक पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. सभापती सौ. पुष्पाताई जयवंतराव सरगर अध्यक्षस्थानी होत्या.
सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर,जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, उपसभापती दादासाहेब मरगळे,भाजपा नेते जयवंतराव सरगर, गट विकास अधिकारी मनोज भोसले,सहाय्यक गटविकास अधिकारी भोसले, विस्ताराधिकारी बाड तसेच आटपाडी पंचायत समितीतील सर्व विभागाचे विभाग प्रमुख व तालुक्यातील सर्व ग्रामसेवक उपस्थित होते.
या आढावा बैठकीमध्ये आटपाडी तालुक्यातील अनेक विकास कामांवर चर्चा करण्यात आली.मंजूर कामे लवकरात लवकर चालू करून पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.अपूर्ण कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.तसेच नवीन कामांच्या मागण्या देण्यात याव्यात याबद्दल सूचना देण्यात आल्या.