माळशिरसमध्ये कृष्णाई हॉस्पिटलचे उद्घाटन !

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

माळशिरस येथील डॉ.अमोल वगरे यांच्या कृष्णाई हॉस्पिटल व प्रसूतीगृह या हॉस्पिटलचा शुभारंभ जिल्हा नियोजन समिती सदस्य उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
माळशिरस तालुक्यातील ६१ फाटा सीदाचीवाडी येथे छोटी लोकवस्ती असलेल्या गरीब शेतकरी वैजयंती व पंढरीनाथ वगरे यांचा मुलगा डॉ.अमोल यांनी जिद्द व चिकाटी व ध्येय ठेवून एम.एस.(स्त्री रोगतज्ञ) पदवी संपादन केली. दोन वर्षे अन्य हॉस्पिटलमध्ये अनुभव घेतला.दुसरा मुलगा सिव्हिल इंजिनिअर करून फार्मसीमध्ये करिअर केले.तर तिसऱ्या मुलाने दहावी पर्यंत शिक्षण घेतले आहे.तिन्ही मुलांनी चीज केल्याचं समाधान वडिल पंढरीनाथ वगरे यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
यावेळी उत्तमराव जानकर, रमेश पाटील आदींनी डॉ. अमोल वगरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य उत्तमराव जानकर,रमेश पाटील,तुकाराम देशमुख,रामचंद्र सीद, रघुनाथ चव्हाण,पांडुरंगतात्या वाघमोडे, सचिन वावरे, डॉ.प्रवीण पाटील,मारुती देशमुख,बाळासाहेब सरगर,बाबासाहेब माने,विकास धाइंजे,सोमनाथ वाघमोडे,अजय सकट,डॉ.समीर बंडगर,डॉ.दत्तात्रय सर्जे,डॉ.संजय सिद,डॉ.प्रवीण पाटील,डॉ. प्रशांत पाटील,डॉ. असित अरगडे,डॉ.एम.बी.गोरड,डॉ.दत्तात्रय वाघमोडे,शिवाजी सीद,अप्पासाहेब कर्चे,सुरेश टेळे,डॉ.कोळेकर,आदी मान्यवर उपस्थित होते.