
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
तालुक्यातील उंटवाडी येथे सी.एल.पी. पावर इंडिया व दिलासा जनविकास प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या विद्यमाने सामाजिक दायित्व निधीतून ५०० लिटरचे पाणी शुद्धीकरण यंत्र बसवण्यात आले आहे, याचे उद्घाटन सी.एल.पी चे कार्यक्रम अधिकारी संतोष मिस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दिलासा जनविकास प्रतिष्ठानचे समन्वयक विलास राठोड, सुभाष जगताप, श्रीमंत राठोड, सरपंच खंडू फडतरे ,उपसरपंच लक्ष्मी तुळजानावर, ग्रामसेविका पी.एच गाडे, ग्रा.पं सदस्य मानसी सुतार, लिंबेवा मुताना खोत, सावित्री अलोडी, राहुल पवार, माजी सरपंच पांडुरंग पाटोळे, दत्तू फडतरे,शंकर पाटोळे, भीमसेन तळसंगी, शिवानंद खोत, लक्ष्मण साळुंके, भगवान कदम, राहुल आरगोडी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती