शिराळा येथे ई-पीक पाहणी

शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा: तहसिलदार संतोष काकडे
रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/,चांदूर बाजार, (कृष्णापुर) :

अमरावती तालुक्यातील शिराळा येथील शेतीची ई-पिक पाहणीला सुरवात झाली आहे. विविध कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व नियोजनासाठी ई-पिक पाहणी उपयुक्त ठरणार असुन,, ही प्रक्रिया गतीने राबवावी व शेतकरी बांधवांचा सहभाग वाढावा, असे आवाहन अमरावतीचे तहसिलदार संतोष काकडे यांनी केले आहे.
अमरावती तालुक्यातील शिराळा येथे भेट देवुन तहसिलदार संतोष काकडे यांनी स्वत: या प्रक्रियेत सहभागी होवून संबंधित बाबीची माहिती शेतकरी बांधवांना दिली व अधिकारी – कर्मचारी, शेतकरी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी १५ सप्टेंबरनंतर सदर ऍप बंद होत असल्याने तत्पूर्वी शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची नोंद करावी असे सांगितले.
ई-पिक पाहणी प्रकल्प प्रायोगिक तत्वावर अचलपुर तालुक्यात सर्वप्रथम राबविण्यात आला. आता तो जिल्हात व राज्यात सर्वत्र राबविण्यात येत आहे.पीक पेरणी अहवालाचा रियल टाइम क्राप डेटा संकलित होण्याच्या दृष्टीने या प्रक्रियेत पारदर्शक आणणे, प्रक्रियेत शेतक-यांचा सहभाग मिळवणे ,कृषी पतपुरवठा सुलभ करणे , नैसर्गिक आपत्तीमुळे पिंकाचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई देणे, पिक विमा प्रक्रिया गतिमान करणे, वन्य प्राण्यांनी शेती पिकांच्या नुकसानामध्ये पीक पेरणीची माहिती शेतक-यांनी स्व: उपलब्ध करुन घेण्याच्या दृष्टीने हा ई- प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. ई-पीक पाहणीमुळे राज्यातील पिकांचे क्षेत्र अचूक कळाल्याने आर्थिक पाहणी व कृषी नियोजनासाठी मदत होणार आहे.त्यामुळे अधिकाअधिक शेतकरी बांधवांचा या प्रक्रियेत सहभाग वाढवावा, असे आवाहन तहसिलदार संतोष काकडे यांनी केले.त्यावेळी मंडळ अधिकारी सुनिल उगले , तलाठी पंकज वानखडे , पोलिस पाटील प्रशांत ढोरे , महाजन , कोतवाल सागर देशमुख, सचिन देशमुख व गावातील शेतकरी ,प्रतिष्ठीत नागरिक यावेळी उपस्थित होते.