भर मांडवात नवरीनं नवरदेवाला झापलं अन् कुरवल्याला कानफाडलं!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /मुंबई:
भर मांडवात गुटखा खाणाऱ्या नवरदेवाला नवरीने पाहुण्यासमोरच झापलं अन् मित्राला थेट मारल्याची घटना एका व्हिडिओमधून सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. नवरीच्या भीतीने नवरदेवसुद्धा चांगलाच ताळ्यावर येऊन त्याने खाल्लेला गुटखा थुंकून टाकला आहे.
सोशल मीडियावर सध्या एक आगळावेगळा व्हिडिओ व्हायरल झाला आहे व तो चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये गुटखा खाणाऱ्या एका नवरदेवाला नवरीने अद्दल घडवली आहे. नवरीच्या भीतीने नवरदेवसुद्धा एका क्षणात ताळ्यावर आला आहे. नवरदेवावर नवरी चांगलीच भडकली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये लग्न समारंभ सुरू आहे. लग्नसोहळ्यात लग्नविधी सुरू असताना नवरी आणि नवरदेव एकमेकांच्या बाजूला बसले आहेत. याचवेळी समोर नवरदेव आणि त्याचा मित्र गुटखा खात असल्याचे नवरीच्या निदर्शनास आले.ते पाहून नवरी चांगलीच भडकली. भर मांडवात नवरीने दोघांना चांगलं झापलं असून थेट मारलंसुद्धा आहे.नवरीचा हा अवतार पाहून नवरदेव घाबरला. नवरी रागावल्यामुळे नवरदेवाने तोंडातील गुटखा फेकून दिला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. व्हायरल झालेला नेमका व्हिडिओ कोणत्या भागातील आहे याबद्दल मात्र अद्याप समजले नाही.