

पळून जाऊन दोघांनी केलं लग्न!
काही वर्षांनी दोन वर्षाचे बाळंच घेऊन आले घरी!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/बदायू(उ.प्र.) :
एका सासऱ्याचे आपल्या सुनेवर प्रेम जडलं.नंतर सासरा आपल्या सूनेला घेऊन तिच्या सहमतीने पळून गेला. काही वर्षांनी सोबत दोन वर्षाचे बाळ घेऊन दोघेही घरी परतले.असा अजब प्रकार बदायू येथे घडला आहे.
‘प्रेमात वयाचं बंधन नसतं’ असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. अनेकजण प्रेमासाठी समाजाच्या विरोधात जातात, असे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील.मात्र आता एक अजब प्रकरण समोर आले आहे.यात एका सासर्याचे आपल्या सुनेवरच प्रेम जडले. इतकंच नाही तर नंतर सासरा आपल्या सुनेला घेऊन पळूनही गेला. यात सुनेचीही सहमती होती.नंतर काही वर्षांनी ते दोघेही आपल्यासोबत दोन वर्षाचे बाळ घेऊन घरी परतले.
उत्तर प्रदेशाच्या बदायू मधील बिसोली कोतवाली परिसरातील दबथरा गावातील ही घटना आहे. महिलेच्या अगोदरच्या पतीने आपल्या पत्नी आणि वडिलांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.यानंतर पंचायत बोलविण्यात आली. मात्र सर्वांनी सासरे आणि सूनेच्याच बाजूने निर्णय दिला.
या महिलेचे लग्न जेव्हा तिच्या पहिल्या पतीसोबत झाले, तेव्हा ती अल्पवयीन होती. यानंतर महिलेने आपल्या पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला.नंतर या महिलेने आपल्या इच्छेप्रमाणे सासऱ्यासोबत लग्न केले.
महिला आणि तिच्या पहिल्या पतीचे २०१६ मध्ये लग्न झाले होते. एका वर्षांपूर्वीच झालेलं मुलाच्या आईचंं निधन हे घाईघाईत लग्न करण्याचं कारण होतं. यानंतर मुलासोबत लग्न केलेल्या सुनेवरच सासर्याचे प्रेम जडले आणि नंतर दोघेही एकमेकावर प्रेम करू लागले. यानंतर महिलेनेेे पतीसोबत घटस्फोट घेऊन सासऱ्यासोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. आपल्या सूनेसोबत लग्नगाठ बांधणार्या या व्यक्तीचंं नाव आहे देवानंद.त्याचे वय सुमारे ४५ वर्षे आहे. लग्नानंतर सहा महिन्यातच संबंधित महिला आणि तिच्या पतीच्या नात्यात दुरावा आला होता. यानंतर महिलेची आपल्या सासऱ्यासोबत जवळीक वाढली आणि दोघांनीही लग्न केले.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती