

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/मुंबई:
मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्यासोबत वैचारिक, सामाजिक, राजकिय, शैक्षणिक व विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी स्व. भाई गणपतरावजी देशमुख यांना पद्मश्री किताब मिळावा,त्यांचे भव्य स्मारक विधानभवन व सांगोला परिसरात उभारावे, त्यांनी पाणी चळवळीसाठी केलेल्या कामाचा उचित सन्मान म्हणून टेंभू योजनेला भाई गणपतरावजी देशमुख यांचे नाव द्यावे, अशी निवेदनाद्वारे मागणी वैचारिक बुलंद आवाज प्रा.यशपाल भिंगे, राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव प्रा.नारायण खरजे, सामाजिक नेते उल्हासशेठ धायगुडे, बहूजन वैचारिक प्रवक्त्या कु. प्रियदर्शिनी ताई कोकरे, वैचारिक नेतृत्व विवेक कोकरे, काकासाहेब मारकड, समाजसेवक अशोक वाघमोडे, कु.भारतरत्न कोकरे व आदि पदाधिकारी व शिष्टमंडळ यांनी केली.
कै.भाई गणपतरावजी देशमुख यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला अमिट ठसा उमटवलेला आहे.विधिमंडळात ११ वेळा एकाच पक्षातून निवडून येऊन त्यांनी जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. आदर्शवादी राजकीय नीतीमूल्यांच्या पायावर त्यांनी तमाम समाजाच्या विकासासाठी आपले आयुष्य व्यथीत केले.
यावेळी जयंतराव पाटील यांनी त्वरीत या विषयांवर लक्ष देऊन भाई गणपतरावजी देशमुख यांचे आदर्शवत काम संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी व सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या ह्रदयापाशी असून वरील शिष्टमंडळाची निवेदन देऊन केलेली विनंती अगदी योग्यच आहे. स्व.भाई गणपतरावजी देशमुख यांचे काम संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक
,शैक्षणिक पटलावर कायमच आदर्शवत राहणार आहे आणि त्यांचे लवकरच भव्य स्मारक सांगोला परिसरात उभारणार असे मत जयंतराव पाटील यांनी केले.
निवेदनात दिलेल्या विविध मागण्या सर्व योग्यच असून एक एक मुद्दा सोडविणे महत्वाचे आहे असे मंत्री पाटील म्हणाले. यावेळी युवा नेते उल्हासशेठ धायगुडे पाटील यांनी विषय त्वरीत हाती घ्यावा अशी आग्रहाची विनंती केली.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद