

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
माडग्याळ पोलीस चौकी येथे उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांची उमदी येथून बदली झाली. माडग्याळचे भाजपाचे युवा नेते कामाण्णा बंडगर यांच्याकडून श्रीगणेशाची मुर्ती देऊन सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी बोलताना कामाण्णा बंडगर म्हणाले की, कोळेकर साहेबांनी अनेक धडाकेबाज कामगिरी करत अनेक गुन्हे उघड उघडकीस आणले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी त्यांंचा सिंहाचा वाटा आहे.काही मुद्द्यांवर मतभिन्नता असली तरी अत्यंत संवेदशील मानल्या जाणाऱ्या उमदी पोलीस ठाण्याचे कार्यभार पोलीस अधिकारी दत्तात्रय कोळेकर व नामदेव दांडगे यांनी चोख बजावला.
गेल्या दोन वर्षांपासून सर्वत्र थैमान घालणाऱ्या कोरोनाची परिस्थिती उत्तमरित्या हाताळली. कार्यक्षेत्रात कोरोना रुग्ण वाढणार नाहीत, याची पूर्ण खबरदारी घेतली. अशा दोन्ही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी उमदी पोलीस ठाण्याचा कार्यभार उत्तम प्रकारे हाताळल्याबद्दल आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी उमदी जिल्हा परिषद गटाचे भाजपाचे नेते संजय (आण्णा) तेली, माडग्याळ गावचे सरपंच इराण्णा जत्ती, लिबांजी माळी,कामदेव कोळेकर, गणेश पवार,दशरथ सावंत,राजकुमार कांबळे, चंद्रु माळी उपस्थित होते.तसेच पोलीस कर्मचारी श्रीशैल वळसंगकर , सुनिल गडदे , विक्रम घोदे , शिवाजी हाक्के व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद