घोंगडे क्लासेसचे संस्थापक नंदकिशोर घोंगडे यांना ‘पत्नीशोक’!

सौ.लक्ष्मी घोंगडे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ दिघंची:
दिघंची व आटपाडी येथील सुप्रसिद्ध घोंगडे क्लासेसचे संस्थापक व संचालक नंदकिशोर महादेव घोंगडे यांच्या सुविद्य पत्नी सौ.लक्ष्मी नंदकिशोर घोंगडे यांचे ‘फंगल निमोनिया’च्या प्रदीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले.
घोंगडे क्लासेस,आटपाडी व दिघंचीचे संस्थापक व संचालक तसेच २००५ पासून आदर्श विद्यामंदिर राजेवाडी येथे कायम सेवेत असणारे नंदकिशोर महादेव घोंगडे यांच्या सुविद्य पत्नी सौ.लक्ष्मी घोंगडे (वय ४८ वर्ष) यांच्यावर २०१४ पासून ‘फंगल न्यूमोनिया’चे उपचार सुरु होते. त्यांचे सोमवार दिनांक २३ रोजी सकाळी ७.२९ मिनिटांनी सांगली येथे रुग्णालयात त्यांचे निधन झाले.त्यांच्यावर एकूण १९ दिर्घकालीन आजारांवर सात वर्ष उपचार सुरू होते. दुपारी दिघंची येथील राहत्या घरापासून अंत्ययात्रा व लिंगायत स्मशानभूमी दिघंची येथे उत्तरकार्य करण्यात आले.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.