कावा साधला, डाव मांडला! गोपीचंद पडळकर ‘बोलले’ ‘ते केले’

कावा साधला, डाव मांडला!
गोपीचंद पडळकर ‘बोलले’ ‘ते केले’
प्रशासनाला चकवा देत बैलगाडी शर्यती सुरू
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी :
महाराष्ट्रभर गाजावाजा झालेल्या झरे येथील बैलगाडी शर्यतीला प्रशासनाने डोळ्यात तेल घालून खोडा घालण्याचे प्रयत्न केले असतानाच आमदार गोपीचंद पडळकर यांनी गनिमीकावा साधत बैलगाडी शर्यतीचा डावा सकाळी मांडला आहे.आत्ता स्पर्धेसाठी या लॉट वेळी सात बैल गाड्या सोडण्यात आल्या आहेत.

मोठ्या उत्साहात बैलगाडी शर्यती सुरू झाल्या आहेत. झरे व निंबवडे गावा दरम्यान असणाऱ्या वाक्षेवाडी पठारावर धुमधडाक्यात शर्यतीला सुरुवात झाली आहे.प्रशासनाने बैलगाडी शर्यतीच्या जाहीर केलेल्या मार्गावर खंदक खणले होते व अडथळा निर्माण केला होता. तसेच या शर्यतीच्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. शर्यतीला बैलगाड्या येऊ नयेत,म्हणून कडक नाकाबंदी केली होती. सर्वत्र पोलिसांचा फौजफाटा कार्यरत होता. अखेर पडळकर यांनी ‘बोलले तेच केले’ व शर्यती सुरू झाल्या . आयत्यावेळी शर्यतीचे मैदान बदलून वाक्षेवाडीच्या पठारावर या शर्यती आज सकाळी सुरू झाल्या सध्या एका लॉटमध्ये सात बैलगाड्या शर्यती साठी सोडण्यात आल्या आहेत गनिमी काव्याने शेतकऱ्यांची बाजू घेऊन शर्यतीचा डाव यशस्वी केला आहे.