
रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/अमरावती/ चांदूर बाजार (कृष्णापुर) :
चांदुरबाजार येथील भारतीय बौध्द महासभा यांच्या वतीने तहसिलदार यांचेमार्फत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्यामध्ये खालील मागण्या करण्यात आल्या.यापुढे सर्व प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी होणा-या राज्यातील विविध स्तरावरील जसे मंत्रालय,विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार व राज्यातील सर्वच ठिकाणी होणा-या ध्वजारोहणाच्या प्रमुख शासकीय समारंभामध्ये व इतरही शासकिय,निमशासकिय कार्यालय, सार्वजनिक उपक्रमे,शाळा महाविघालयातील कार्यक्रमातून भारतीय संविधानातील उद्देशपत्रिकेचे सामुहिक वाचन करण्यासंबधीचे स्वयंस्पष्ट निर्देश देण्यात यावे.
भारतीय संविधानातील उद्देशिकेचे सामुहिक वाचन ध्वजारोहन समारंभातील एक मुख्य भाग समजण्यात यावा.
ज्या ठिकाणी ध्वजारोहन समारंभादरम्यान भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करण्यात येणार नाही,त्या संबंधीत अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करुन त्यांचेविरुध्द विभागीय खाते चौकशी सुरु करावी. या मुद्यांचा अंर्तभाव शासनाचा प्रमुख विभाग असलेल्या सामान्य प्रशासन विभागातील पत्रातून स्वयंस्पष्टपणे करण्यात यावा. या मागण्याची येथोचित अंमलबजावनी करावी.
अध्यक्ष पवन मनोहरे,बुध्दभुषण तागडे,सुभाष बागडे,सुबोध खडसे,जयश्री वासनीक,योगेश तानोलकर,सिध्दार्थ पाटील,रामेश्वर यावले,निलेश मनोहरे,अरुण तेलमोरे,योगेश पाटील,सचीन तायडे उपस्थित होते.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक