

कविता यादव
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/दिघंची:
दिघंची येथे सौ.भाग्यश्री व श्री.अतुल जावीर यांच्या महालक्ष्मी महिला गृह उद्योग केंद्रांतर्गत हवाई चप्पल मॅन्युफॅक्चरिंगचे ब्रँड लॉन्चिंग मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आटपाडी तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख व आटपाडी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.जयमाला हणमंतराव देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ.अश्विनी अष्टेकर, महादेव खांडेकर, सौ.वैशाली पांढरे, सौ.उज्वला नलवडे-मोरे, सौ.काजल हेगडे,मोहन भोसले,जयंत पांढरे, सुधीर जावीर,मल्हारी बुधावले, समाधान भोसले, अजिनाथ जावीर, विनायक ऐवळे, मिलींद वाघमारे, महेंद्र माने, संदीप शिंदे,दिग्विजय जावीर,बाबासाहेब जावीर, सुनिल जावीर उपस्थित होते.मालक अतुल जावीर यांनी स्वागत केले.सुंशात जावीर यांनी सुत्रसंचालन केले.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती