नगरपंचायतीसाठी ठोक निधी मिळावा : आ.मोहिते-पाटील

अकलूज,नातेपुते व महाळुंग नगरपंचायतीसाठी ठोक निधी मिळावा : आ.मोहिते-पाटील यांची नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :

शासनाच्या ठोक तरतुदीतून अकलूज नगरपरिषद तसेच नातेपुते व महाळुंग नगरपंचायतीसाठी २६ कोटींचा निधी मिळावा अशी मागणी आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे .
निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने महाळुंग नगरपंचायतीची, तर सलग ४३ दिवस साखळी उपोषण करुन अकलूज नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायतीची शासनाने घोषणा केली.माळशिरस तालुक्यातील माळशिरससह अकलूज, नातेपुते व महाळुंग या नगरपंचायती शासनाच्या नगरविकास मंत्रालयाच्या अधिन आल्याने या नगरपंचायतींना रस्ते व विविध विकास योजनांसाठी निधी मिळावा, म्हणून आ.मोहिते पाटील यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे .
या पत्रात रस्ते विकासासाठी अकलूज नगरपरिषदेला सात कोटी तर नातेपुते व महाळुंग नगरपंचायतीसाठी प्रत्येकी तीन कोटी असा १३ कोटी तर ठोक निधीतून अकलूज नगरपरिषदेला सात कोटी तर नातेपुते व महाळुंग नगरपंचायतीला प्रत्येकी तीन कोटी असा १३ कोटी निधी मिळावा अशी मागणी आ.मोहिते पाटील यांनी केली आहे . नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी २६ कोटी निधी मिळाल्यास विकास कामांना गती येइल असे आ. मोहिते पाटील म्हणाले.