झरेतील शर्यतीसाठी माळशिरसमधील बैलगाडी जाणार : बाळासाहेब सरगर


संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :

विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी झरे ता. आटपाडी जि. सांगली याठिकाणी राज्यस्तरीय बैलगाडी शर्यत आयोजित केली असून त्या शर्यतीसाठी राज्यातून बैलगाडी मालक-चालक त्या ठिकाणी दाखल होणार आहेत. परंतु बैलगाडी शर्यतीचे माहेरघर म्हणून संबोधले जाणारे माळशिरस तालुका या ठिकाणाहूनही झरे येथील शर्यतीच्या ठिकाणी जाण्यासाठी बैलगाडी चालक मालक संघटनेची माळशिरस विश्रामगृहावर बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हा अध्यक्ष किसान मोर्चा बाळासाहेब सरगर , भाजप नेते नागेश वाघमोडे , युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दादासाहेब खरात ,आकाश सिद ,माजी नगराध्यक्ष अशोक वाघमोडे ,माजी नगरसेवक विजय कचरे ,महादेव वाघमोडे , भगवान शेंडगे , विशाल कोळी , जयराम सूर्यवंशी ,संभाजी वाघमोडे , संजय वाघमोडे , विलास देवकते ,मारुती सरगर , गजानन पालवे ,सुरज देशमुख सह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे, तर हिंदू धर्मामध्ये गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असल्याची भावना सामान्य माणसांमध्ये आहे. आज गाई संभाळणे कठीण झाले आहे. परंतु गाईपासून बैल जन्म झाल्यानंतर त्याचा उपयोग पूर्वीपासून शेती कामासाठी केला जायचा. अलीकडच्या यांत्रिक युगामध्ये शेती ट्रॅक्टरने केली जात असलेने बैल पाळणे शेतकऱ्यांनी सोडून दिले आहे.परंतु गाई जोपासायची असेल तर शर्यतीसाठी बैलाचा उपयोग केला जातो. परंतु केंद्र सरकारने तत्कालीन केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी हिंस्र प्राण्यांच्या यादीत घातल्याने शर्यतीवर बंदी आणली गेली आहे. परंतु इतर राज्यात तामिळनाडुमध्ये जलीकट्टू हा खेळ खेळला जातो. त्याठिकाणी बंदी नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये बैलगाडी शर्यतीवर बंदी आहे.
ही बंदी झुगारून महाराष्ट्रातील तमाम शेतकरी व बैलगाडी चालक प्रशासनाच्या दडपशाहीला झुगारून झरे याठिकाणी २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैलगाडा शर्यतीसाठी मोठ्या प्रमाणात जमा होणार आहेत.याची दखल घेऊन राज्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून या शर्यतीवरील बंदी हटवावी, अशी मागणी बैलगाडी चालक-मालक संघटनेने केले आहे. तर माळशिरस तालुक्यातून २०१ बैलगाडी झरे या ठिकाणी जाणार असल्याचा निर्धार बैलगाडी चालक मालक आकाश सीद व नगरसेवक अशोक वाघमोडे यांनी बैठकीमध्ये बोलताना व्यक्त केला .