
आटपाडी तालुका : कोरोनायन दि.१८/०८/२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी तालुक्यात आज दि. १८ ऑगस्ट रोजी नव्याने २० लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर ५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये १४ पुरुष असून ६ स्त्रियांचा समावेश आहे.अँटीजन चाचणीद्वारे १९ जणांचे व आरटीपीसीआर चाचणीद्वारे १ जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यापैकी आटपाडी तालुक्यातील १९ व तालुक्याबाहेरील १ व्यक्तीचा समावेश आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून व सतर्क राहून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.१८ ऑगस्ट,२०२१)
आटपाडी ३
बनपुरी १
दिघंची ५
गळवेवाडी १
घाणंद १
गोमेवाडी १
जांभुळणी १
खरसुंडी २
तडवळे २
उंबरगाव १
वलवण १
लोटेवाडी १

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती