तरंगफळ येथे रात्री तरसाच्या हल्ल्यात गाय ठार

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस  :

      तरंगफळ ता.माळशिरस येथील  जर्सी गाई तरस या प्राणीने रात्री दोनच्या सुमारास हल्ला करून जीवे मारल्याची घटना सुखदेव तरंगे यांची घरी घडली.
     याबाबत अधिक माहिती अशी की, रात्री दोनच्या सुमारास दोन तरस येऊन त्यांनी अचानक जर्सी गाईच्या अंगावर हल्ला केला. त्यात गाईचा मृत्यू झाला. भीतीच्या वातावरणामुळे पुढे कोणीही येऊ शकले नाही. सकाळी माळशिरस तालुका वन विभागीय अधिकारी आय. ए.एच शेख यांना याबाबतची माहिती मिळताच ताबडतोब अधिकाऱ्यांना पाठवून घटनेचा पंचनामा वनसंरक्षक के. डब्लू.शेख, वनपाल एच.व्ही. साळुंखे,गोरख तरंगे,सावळा कांबळे यांनी केला.
या घटनेमुळे तरंगफळ व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.