आटपाडी तालुका : कोरोनायन दि.१२/०८/२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी तालुक्यात आज दि. १२ ऑगस्ट रोजी नव्याने १५ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये १२ पुरुष असून ३ स्त्रियांचा समावेश आहे.अँटीजन चाचणीद्वारे १५ जणांचे व आरटीपीसीआर चाचणीद्वारे ० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यापैकी आटपाडी तालुक्यातील १४ व तालुक्याबाहेरील १ व्यक्तींचा समावेश आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून व सतर्क राहून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.१२ ऑगस्ट,२०२१)
देशमुखवाडी १
पिंपरी खुर्द १
विठ्ठलापूर २
दिघंची ५
करगणी १
वलवण १
चिंचाळे १
पिंपरी बुद्रुक २
वाटंबरे १

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती