संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:
माळशिरस येथे सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा टेळे यांच्यासह महिलांनी नगरपंचायतीला विविध मागण्यांचे निवेदन दिले.
माळशिरस येथील पुणे-पंढरपूर व म्हसवड -अकलूज मार्गावरील अहिल्यादेवी होळकर चौकातील रस्ते मोठे व खुले झाल्याने वाहन चालक भरधाव वेगाने येत असतात.त्यामुळे सध्या या ठिकाणी भरपूर प्रमाणात अपघात होत आहेत. तसेच ऊस कारखाने चालू झाल्यानंतर ऊसाचे ट्रॅक्टर भरपूर प्रमाणात जातात. चौकांमध्ये तातडीने स्वयंचलित सिग्नल व्यवस्था बसविण्यात यावी, त्याचबरोबर माळशिरस शहरातील मुख्य नगरपंचायतसमोर तसेच मशिदीसमोर गटारी उघड्या आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. लोकांना त्याचा खूप त्रास होत आहे.सध्या साथीच्या रोगाचे प्रमाण वाढले असून यामुळे अनेक लोकांना त्याचा त्रास होत आहे.या दोन ठिकाणच्या गटारींना झाकण तातडीने बसवण्यात यावे. तसेच माळशिरस बसस्थानक ते उमाजी नाईक चौक याअंतर्गत रस्त्यात गतिरोधक करण्यात यावेत, अशा मागण्यांचे निवेदन नगर पंचायत कार्यालयात अधीक्षक सौ.भाग्यश्री बेडगे यांना देण्यात आले. यावेळी माळशिरसमधील सामाजिक कार्यकर्त्या सौ. रेश्मा टेळे, प्रिया काशिद, साधना साळुंखे,अश्विनी थोरात, वनिता दळवी, सोनाली जाधव,रूपाली काशीद, उर्मिला गुरव, निर्मला दीक्षित, रूपाली गुजरे, विद्या गुरव, अनारकली मनेरी, सुमया मनेरी, जया गुरव,कांचन साळुंखे आदि महिला उपस्थित होत्या.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती